श्री. आशिष येरेकर
माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा पारिषद अहिल्यानगर
माननीय प्रकल्प संचालक
जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, अहिल्यानगर
जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, अहिल्यानगर हि स्वायत्त संस्था असून स्थापना दिनांक २ फेब्रुवारी १९८२ रोजी झाली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अहिल्यानगर कार्यालय मार्फत विविध केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
जिल्ह्यात दारिद्र रेषेखाली असणारे कुटुंबाकरिता मुलभूत सुविधा पुरवण्याचे कार्य या कार्यालयामार्फत करण्यात येते. ग्रामीण भागातील दारिद्र रेषेखालील असणाऱ्या कुटुंबांचे जीवनमान उंचावण्याकरिता त्यांना पक्की घरे, निवारा व आर्थिक आणि व्यावसायिक योजना राबवणे व त्यांचा कृतीसंगम करुन विकास करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, अहिल्यानगर हे कार्यालय कटिबद्ध आहे.
१. केंद्र शासन पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करणे.
२. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना वैयक्तिक व सामुहिक योजनांमध्ये लाभ देणे.
३. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची स्वरोजगारासाठी कर्ज प्रकरणे हाताळणे.
४. लाभार्थींना आपले उत्पन्न वाढविता यावे यासाठी गुंतवणूक किंवा उत्पादक उद्योग धंदे काढण्याच्या दृष्टीने आदर्श योजना तयार करणे.
५. DISHA (District Development Coordination and Monitoring Committees) समितीची बैठक घेणे.
१. केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजना
२. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान