महाराष्ट्र शासन

जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा

अहिल्यानगर

Emblem India
सर्व आवास योजनांचा मागील आर्थीक वर्षाचा प्रगती अहवाल
अ.क्र. योजना प्रगती अहवाल
१. प्रधानमंत्री आवास योजना अहिल्यानगर जिल्हयामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकुण ५९३५६ घरकुले मंजुर आहेत पैकी ५५३०७ घरकुले पुर्ण झाले आहेत. पुर्णत्वाचे प्रमाण ९३.२०% आहे.
२. रमाई,शबरी,पारधी योजना राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत (रमाई,शबरी,पारधी) अंतर्गत ३३९३८ घरकुलांचे उद्दिष्ट आहे, त्यापैकी ३९७१६ घरकुले मंजुर झाली आहेत. मंजुर घरकुलांपैकी ३३२५९ घरकुले पुर्ण आहेत, पुर्णत्वाचे प्रमाण ८१.२२% आहे.
३. मोदी आवास योजना मोदी आवास योजनेअंतर्गत ४३५६ घरकुलांचे उद्दिष्ट आहे, पैकी ४३३६ घरकुले मंजुर करण्यात आली आहेत, मंजुरीचे प्रमाण ९९.५४% आहे.
४. पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना

भूमीहिन लाभार्थ्यांना पंडित दीन दयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थ सहाय्य योजने अंतर्गत जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.ज्याठिकाणी महाराष्ट्र शासनाची अथवा ग्रामपंचायतची जागा उपलब्ध आहे अशा ठिकाणी मोफत जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जिल्हयात उभारण्यात आलेल्या गृहसंकुलात एकुण ३१० लाभार्थींना घरकुले उपलब्ध झाली.

गृहसंकुल प्रकल्पात पुरविण्यात आलेल्या सुविधा:-
३०० स्क्वेअरफुट आकारमानाचे घर त्यामध्ये शौचालय, बाथरूम, विद्युतीकरण, फरशी, किचन-ओटा, कंपाऊंडवॉल, १४ व्या वित्त आयोगअंतर्गत रस्ते, जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याचेपाणी, वृक्षारोपण, हायमॅक्सदिवे.

गृहसंकुल लाभार्थी:-

अ.क्र. तालुका व गाव लाभार्थी
नगर नांदगाव ४०
नगर खारेकर्जुने ६०
श्रीरामपूर मालुंजे २८
राहाता कणकुरी २०
राहाता हसनापुर १०
राहाता लोणी ६०
श्रीगोंदा वांघदरी ४०
कोपरगाव शिंगणापूर १०
कोपरगाव कोकमठाण १०
१० संगमनेर चिकणी
११ संगमनेर खराडी १८
५. डेमो हाऊस जिल्हयात एकुण १५ डेमो हाऊस उभारण्यात आले आहे (१४ तालुकास्तरावर व १ जिल्हास्तरावर).
६. घरकुलमार्ट व बहुमजली इमारती जिल्हयात एकुण ३४ घरकुलमार्ट व २४ बहुमजली इमारती उभारण्यात आली आहेत.
७. अमृत महाआवास अभियान

अमृत महाआवास अभियान अंतर्गत अहिल्यानगर जिल्हयात प्रधानमंत्री आवास योजनेत सर्वात जास्त १५३२२ व राज्य पुरस्कृत योजनेत ५०४२ असे एकुण २०३६४ घरकुले पूर्ण करुन केंद्र व राज्य पुरस्कृत योजनेत राज्यात प्रथम क्रंमाक प्राप्त केला आहे.

अमृत महाआवास अभियान अंतर्गत नाशिक विभागामध्ये अहिल्यानगर जिल्हयाला १२ मानांकनात १४ पुरस्कार प्राप्त झाले.

अमृत महाआवास अभियान अंतर्गत भुमिहिन लाभार्थींना जागा उपलब्ध करुन ११ गृहसंकुल प्रकल्प उभारण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे.

८. महाआवास अभियान महाराष्ट्र राज्यात राबविण्यात आलेल्या महाआवास अभियान टप्पा १ मध्ये अहिल्यानगर जिल्हयास एकुण १० पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
© Copyright 2024 All Rights Reserved.