ग्रामीण भागातील दारिद्रयाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी, केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामिण जीवनोन्नती अभियानाची स्थापना केलेली आहे. दारिद्रयाचे निर्मुलन करण्यासाठी ग्रामिण गरिबांना एकत्र आणून, त्यांचे सक्षम संस्था उभारणे, संस्थामार्फत गरिबांना वित्तिय सेवा पुरवणे, त्यांची क्षमता वृध्दी करणे आणि उपजीविकेचे साधने उपलब्ध करून देऊन त्यांना दारिद्र्याच्या बाहेर येण्यासाठी मदत करणे हे या अभियानाचे प्रमुख उद्देश आहे.
केंद्र शासनाने सन २०११-१२ पासून स्वर्ण जयंती ग्रामस्वरोजगार योजनेचे, राष्ट्रीय ग्रामिण जीवनोन्नती अभियानात रुपांतर केले आहे. सन २०१३-१४ पासून हे अभियान राज्यात, इन्टेसिव, सेमी इन्टेसिव, आणि नॉन-इन्टेसिव या तीन कार्यपद्धतिनी राबविण्यात येते.
स्वयंसहाय्यता गटांना दशसुत्री चे पालन करण्यासाठी प्रशिक्षण देणे व त्यांची क्षमता बांधनी करणे आवश्यक आहे. दशसुत्री मधील पहिली पाच सूत्रे स्वयंसहाय्यता गटाची आर्थीक क्षमता वृद्धी साठी उपयुक्त आहेत, तर उर्वरित पाच सूत्रे गटाचा सामाजिक विकास करण्यासाठी अंतर्रभूत करण्यात आली आहे. प्रत्येक स्वयंसहाय्यता गटांने दशसुत्री चे पालन केल्यास गटातील प्रत्येक सदस्याचा आर्थिक व सामाजिक विकास होऊन त्यांचे जीवनमान उंचवण्यास मदत होणार आहे.